Ad will apear here
Next
कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन + सत्यम शिवम सुंदरम
सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन उर्फ अप्पा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वच्छ भारताचा वसा जपला. ते महात्मा गांधी यांचे शिष्य होते. अप्पासाहेबांनी चराची स्वच्छतागृहे व शौचालये खणली. तेव्हापासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या कार्याची माहिती प्रा. सतीशचंद्र तोडणकर यांनी ‘कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन’ या चरित्रात दिली आहे. महात्मा गांधी व अप्पासाहेब यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, भूदान व अप्पासाहेबांनी १९५६मध्ये सुचविलेली चलनशुद्धीची योजना अशा अनेक प्रसंगांतून कोकण गांधी यांचे चरित्रकार्य यातून उलगडले आहे. लेखक तोडणकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील गोपुरी आश्रमात अप्पासाहेब पटवर्धन यांचा सहवास लाभला. वर्ध्याला पवनार आश्रमात जाऊन त्यांनी विनोबा भावे यांचेही दर्शन घेतले. त्यांच्याप्रमाणेच महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्यावरही त्यांची श्रद्धा आहे. या सर्वांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या पुस्तकातून उलगडले आहे. इंदिरा गांधी, साने गुरुजी, भारतीय संस्कृती, लोकमान्य टिळक यांचे गीतारहस्य, स्कॉटिश मिशनरी अल्फ्रेड गॅडने यांचे हायस्कूल असे अनेक विषय या पुस्तकात मांडले आहेत.

पुस्तके : कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन आणि सत्यम शिवम सुंदरम
लेखक आणि प्रकाशक : प्रा. सतीशचंद्र तोडणकर
पृष्ठे : १९१
मूल्य : २०५ रुपये

(कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन आणि सत्यम शिवम सुंदरम ही पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZPVBU
Similar Posts
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील
चला, ‘मान्सून फेस्टिव्हल’ला जाऊ या मुंबई : पावसाळा अनुभवावा तर तो कोकणातला. हिरवीगार भातशेती, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे, कोकणातील छोटी छोटी खेडी, डोंगरांनी पांघरलेले हिरवे गालिचे मन तृप्त करतात आणि अस्सल कोकणी चवीचे जेवण रसनेला तृप्त करते. पावसाळ्यातील कोकण अनुभवता येण्यासाठी ‘कोकण ग्रीनलाइफ हॉस्पिटलिटी’तर्फे दर वर्षी खास ‘मान्सून फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते
स्वस्थ भारत यात्रेतील सायकलस्वार १० तारखेला ठाण्यात ठाणे : ‘नवी दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या स्वस्थ भारत यात्रेचे सायकलस्वार १० नोव्हेंबर २०१८ रोजी ठाण्यात येत असून, सकाळी ११ वाजता टिप टॉप प्लाझा येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर त्यांचे स्वागत
भारतरत्न आचार्य विनोबा गाथा आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार येथील समाधीवर त्यांच्याच हस्ताक्षरात ‘एक दिन जाना है भाई, मेरे जाने के बाद पढत रहो गीताई’, असा मजकूर कोरलेला आहे. विनोबाजींनी गीताईतून जे मार्गदर्शन केले आहे, ते सतीशचंद्र तोडणकर यांनी संपादन स्वरूपात ‘भारतरत्न आचार्य विनोबा गाथा’मधून सादर केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language